भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने विजय ढोरे सन्मानित
पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार, व नीती आयोग संलग्नित आय एस ओ नामांकित डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने 2024 चा *भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार* विजय ढोरे मुंडगाव यांना त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
विजय ढोरे हे श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव व श्री लक्ष्मी नारायण संस्थान मुंडगाव चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कोषाध्यक्ष आहेत.धार्मिक व सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या विजय ढोरे यांचे शिक्षण बीकॉम., बीपीएड, एम पी एड. एवढे झाले आहे .
श्री गजानन महाराज पादुका संस्थान च्या माध्यमातुन विश्वस्त मंडळाच्या सहयोगातून श्री ढोरे यांनी पुढाकार घेऊन मरणोत्तर देहदान, नेत्रदान अभियान, संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय,मुंडगावच्या चंद्रिका नदी खोलीकरन अभियान,संस्थानच्या 2000 सेवाधाऱ्यांच्या मदतीने 65 गावात ग्राम स्वच्छता अभियान,
कन्या भ्रूण हत्या निर्मृलन अभियान, मिशन ऑक्सिजन अंतर्गत 65 गावात कोरोना काळात 10 हजार वृक्षारोपण, व गरजूंना अन्नदान,ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मातृत्व शक्ती सन्मान सोहळा, मुंडगावाच्या नावाचा इतिहास शोधून काढणे. अनाथांची दिवाळी भाऊबीज साजरी करणे.
प. पु. संत भय्यूजी महाराज प्रणित श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट इंदोर द्वारा संचालित धरती पुत्र सेवा अभियान, भूमी सुधार अभियान, बालग्राम योजनेत सक्रिय सहभाग तसेच एच आय व्ही बाधित मुला मुलीं करिता पुणे व अकोला येथील बालगृह, पारधी आदिवासी आश्रम शाळा, खामगाव यांच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा आहे.
विजय ढोरे यांच्या कार्याची दखल सामाजिक संस्थांनी या आधी घेतली असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. यात प्रामुख्याने योगी भूषण पुरस्कार, संत नगरी मुंडगाव नागरी पुरस्कार, निळू फुले फाउंडेशनचा सेवाव्रती पुरस्कार, युवा क्रांती पुरस्कार, कोरोना योद्धा या पुरस्कारांचा समावेश आहे.
ढोरे यांनी मुंडगावाचा प्राचीन इतिहासाची माहिती शोधून संत नगरी मुंडगाव हे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. त्यांच्या संकल्पनेतून श्री गजानन महाराज पादुका संस्थान च्या विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने गावाच्या विकासासाठी “30 कोटी “रुपयाचा संत नगरी मुंडगाव विकास आराखडा टाकला आहे,त्याचा महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा पुढील मानस आहे.
विजय ढोरे हे सर्व मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय श्री गजानन महाराज पादुका संस्थान च्या विश्वस्त मंडळाला देत आहेत.