डॉ. प्रिती प्रधान यांना युवा विचारपिठचा महिला रत्न सन्मान पुरस्कार प्रदान
तेल्हारा
जागतिक महिला दिनानिमित्य युवा विचारपिठ अकोला या सामाजिक संस्थेद्वारे वसंत सभागृह श्री शिवाजी कॉलेज अकोला येथे 10 मार्च 2024 रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अकोला शहरातील प्रसिद्ध डॉ. प्रिती प्रधान संस्थापक डाएटजिनी यांना जेष्ठ समाज सेविका ऍड. अंजलीताई आंबेडकर व डॉ. रेखा पाटील यांचे हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील आहार व आरोग्य यामधील विशेष कार्याबद्दल वैद्यकीय सेवा महिला रत्न पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंचावर डॉ. अभय पाटील अस्थिरोग तज्ञ, डॉ. गणेश बोरकर, सौ. अनिताताई भालेराव उपजिल्हाधिकारी, प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, सौ वर्षाताई खोब्रागडे जिल्हा समन्वयक माविम, श्री राजेश वजीरे तहसीलदार, डॉ. रेखा पाटील , प्रा. डॉ. गणेश बोरकर, प्रा डॉ. संजय तिडके, श्री संजय गायकवाड, श्री शिवाजी दादा म्हैसने, सौ पुनम बोरकर, गोपाल गावंडे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याच वेळी युवा विचारपिठ संस्थेद्वारे आयोजित डान्स MH 30 या नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी युवा विचारपीठचे सर्व समन्वयक श्री राजेश अग्रवाल, श्री सुदेश काळपांडे, श्री गिरिधर भोंडे, अँड शेषराव गव्हाळे, श्री निलेश दहिभाते, आकाश तिडके, जय आसोलकर, नाजूकराव डांगे, सौ.अश्विनी ढोरे, सौ.रीमा ढाकरे, सौ पल्लवी पाठक, अँड सपना गव्हाळे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा विचारपिठ चे अध्यक्ष श्री निलेश ढाकरे, कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्षा सौ.स्मिता अग्रवाल व कु सुरभी दोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन समन्वयक श्री कौशिक पाठक सर यांनी केले.