नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे दि.२० डिसे.रोजी दारू मुक्ती आंदोलन चे वतीने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस यांना राज्याचे मंत्री मा.अतुल सावे यांचे हस्ते निवेदन विधानसभा गृहात दारू मुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत व अध्यक्ष अशोक अण्णाजी सोरटे यांचे हस्ते देण्यात आले. नागपूर येथे यशवंत स्टेडीयम, मधे दि.१९ व २० डिसेंबर ला लक्ष्य वेधी धरणे देण्यात आले. १)महिलांना आई, बहिणीवरुन सार्वजनिक स्थळी अपमानकारक शिव्या दिल्या जातात त्यास प्रतिबंध करणारा तसेच२) महाराष्ट्र राज्यात संपूर्ण दारुबंदी करणारा सक्त शिक्षेचा कायदा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून दारु मुक्ती आंदोलनचे करण्यात आली.तसेंच वरील कायदे न केल्या स राज्यभर महिलांचे आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा निवेदना तून देण्यात आला.
दारु व्यसनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना १०लाख सहाय्य व कुटुंबांचे सर्वांगिण पूनर्वसन करावे, शरीरास हानीकारक असणाय्रा दारुचे उत्पादन करणारे कारखाने बंद करावेत, राज्यातील अवैध दारु दुकाने त्वरीत ३१डिसें.२०२४ पूर्वि बंद करावीत, राज्यातील तिर्थक्षेत्रे व प्रमुख धार्मिक स्थळे शेगांव, पंढरपूर,शिर्डी,तुळजापूर,देहू, आळंदी आदि तसेच राष्टमाता जिजा ऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड(राजा) ३१ डिसेंबर २०२४ पूर्वि दारु मुक्त करावीत,वर्धा(गांधी) जिल्हा;व गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदीची सक्तपणे अंमल बजावणी करण्यास उपाय योजना तातडीने करावी, राज्यातील शेतकय्रांच्या आत्महत्या बंद करण्यास त्वरीत उपाय योजना कराव्यात,व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना १०लाख सहाय्य व सर्वांगिण पूनर्वसन करावे,राज्यात दारु बंदीचे कार्य करणाय्रा कार्य कर्त्यांना दरमहा १५ ह. मानधन व ५ह.प्रवास भत्ता देण्यात यावा. आदि महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन अतुल सावे यांना सादर करण्यात आले,त्यांनी उपरोक्त सर्व मागण्या महिलांचे दृष्टीने व राज्यातील नागरिकांच्या हिताच्या आहेत,त्यावर सविस्तर चर्चा करण्यास, आपले संघटना प्रमुखांना १ महिन्याचे आंत मुंबई ला बैठक बोलावून निमंत्रीत करण्यात येईल असे आश्वासन दिले. वरील धरणे आंदोलनात सौ. गितांजली कोळी,दारुबंदी नेत्या धुळे, रमेश खिरकर, प्रदिप कोठारी, डॉ.श्रीकांत तळवेकर,धर्माजी काळे,हरिश्चंद्र देवळे,हितेश खडसे, राजिवकुमार म्हैसबडवे,योगेश बोळे,आदि दारु मुक्ती आंदोलन पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वश्री गजेंद्र सुरकार,सचिव म.अंधश्रध्दा निर्मूलन समिती, राज्य सचिव,अरुणभाऊ केदार,मुकेश मसुरकर,तात्या मते,प्रशांत नखाते, विदर्भ राज्य आंदोलन समिती, जगदीश कुमार इंगळे,इंदिरा बोंद्रे, अविनाश जांभुळकर,वामन रामपुरे, आदिवासी संघटना,यवतमाळ; आदि शेकडो नागरिक दारु मुक्ती आंदोलनास पाठींबा देण्यास धरणे कार्यक्रमात सहभागी होते.