महाविकास आघाडी चे प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दणक्यात
पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांचे हस्ते कापली फीत
तेल्हारा- एस.पी. इंगोले ९९२२८३५५२५
तेल्हारा तालुक्याच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिनांक १२.०४.२०२४ रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय दादा पाटील यांच्या कडून पदवीधर आमदार धिरजभाऊ लिंगाडे ह्यांचे शुभहस्ते असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे माजी आमदार संजयजी गावंडे, जिल्हा संघटक दिलीप बोचे, मनीष कराळे, तालुका अध्यक्ष अजय गावंडे, शहर अध्यक्ष विवेक खारोडे, राजेश वानखडे, पुरुषोत्तम गावंडे, सचिन थाटे (शिव व्याख्याते), वनिताताई वाकोडे (तालुका अध्यक्ष महिला आघाडी), वैशाली ताई इंगोले शहर अध्यक्ष महिला आघाडी), किरणताई खाडे (शहर उपाध्यक्ष महिला आघाडी), शालिनीताई बोदडे,
प्रहार जन शक्ती पक्षाचे राजेश पाटील खारोडे, जिल्हा अध्यक्ष वसू दादा, तालुका अध्यक्ष मुन्ना बिहाडे, शहर अध्यक्ष विक्की मल, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे जिल्हा अध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, रामप्रभू ताराळे, तालुका अध्यक्ष अशोकराव नराजे, शहर अध्यक्ष भूषण तायडे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. संजीवनीताई बिहाडे, काँग्रेस नेते महेश दादा गणगने,अतुल ढोले शमशील भोपळे, डॉ बिहाडे, जिल्हा अध्यक्ष अशोकराव अमानकर , तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे, तालुका अध्यक्ष अफरोज पठाण, शहर अध्यक्ष संदीप खारोडे, माजी शहर अध्यक्ष प्रशांत देशमुख, माजी शहर अध्यक्ष ऍड पवन शर्मा, माजी शहर अध्यक्ष सोनू मलिये, अंजनकर साहेब, विजय जायले, अन्सार पटेल, अनंत सोनमळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रजियाताई पटेल, शहर अध्यक्ष अग्रवाल ताई तसेच पर्वतराव पाटील वाघ, पत्रकार नानाभाऊ इंगोले, नवशाद भाई सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.