तेल्हारा-सूरज इंगोले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने गोपाल माधवराव विखे शिवसेना, उपजिल्हाप्रमुख,नंदकिशोर निमकर्डे तालुका प्रमुख शेतकरी सेना, अकोला, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ , वैशालिताई इंगोले महिला आघाडी शहर प्रमुख तेल्हारा, गजानन मोरखडे ,पुरुषोत्तम इंगोले पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत तेल्हारा तहसिलदार यांना तेल्हारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करणे सोबतच अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात तेल्हारा तालुका मागील 25 ते 30 दिवसां पासून सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या सोयाबिन, कापुस, तुर, मुग, उडिद व फळबागांचे अतोनात नुकसान झालेले असून शेतक-यांचे कधी न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. जुलै आगष्ट मध्ये सततच्या पासामुळे सर्व पिकांची वाढ थांबल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाप्पात घट झालेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. निशावादी होवून आत्महत्येकडे वळण्याची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे तेल्हारा तालुका ओला 5 म्हणून तात्काळ जाहीर करून शेतक-यांना भरीव नुकसान भरपाई जाहीर करावी.
तसेच सोयाबिन च्या बोगस बियाण्यामुळे तालुक्यातील ब-याच शेतक-यांचया पिकाला फळ धारणा झालेली नसून अशा कंपण्यांवर फौजदारी गुन्ह` दाखल करून त्या शेतक-यांना अतिरिक्त नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीची भरीव मदत तात्काळ शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. ज्या कंपनीच्या सोयाबिन ला फळ धारणा झालेली नाही अशा शेतक-यांना कंपनी कडून अतिरिक्त नुकसान भरपाई देण्यात यावी. व सदर कंपनीवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. अधिसूचना काढून पिक विम्याची अग्रीम 25 टक्के तात्काळ शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात . सात-बा-या वर सन 2023-24 मध्ये असलेल्या सोयाबिन व कपाशी पिकाच्या नोंदी नुसार सरसकट शेतक-यांना अनुदानाचा लाभ देण्यात यावा. वरील सर्व मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात याव्या अन्यथा शिवसेना (उ.बा. ठा) शेतकरी सेना व शेतकरी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोनल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शेकडो शिवसैनिक, शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
सदर निवेदनावर सात दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर शिवसेना, शेतकरी आंदोलन करतील.
गोपाल विखे