तेल्हारा -सुरज इंगोले
आढवडाभरा पासून संपूर्ण महाराष्ट्रभर महिला आघाडीच्या पक्ष बांधणीसंबंधीचां आढावा घेण्यासाठी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे मा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने विदर्भा मध्ये आयोजित करण्यात आले आहेत.त्याच अनुषंगाने राजमंगल कार्यालय आकोट या ठिकाणी अकोला जिल्हा शिवसेना महिला आघाडीचा महिला संवाद मेळावा व महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक,शिवसेना महिला आघाडीच्या अकोला जिल्हा संघटिका प्रा सौ माया म्हैसने यांनी आयोजित केला होता. याकरिता मुंबईहून मा.सौ. रंजनाताई नेवाळकर ,समन्वयक शिवसेना महिला आघाडी महाराष्ट्र राज्य ,मा.सौ. शिल्पाताई सरपोतदार,अध्यक्ष शिव सहकार सेना महाराष्ट्र राज्य, मा.सौ.प्राचीताई पोद्दार ,संपर्क संघटिका कोल्हापूर ,मा. सौ सागरताई पुरी,पश्चिम विदर्भ संपर्क संघटिका,मा.सौ. वैशालीताई घोरपडे अकोला संपर्क संघटिका यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजक प्रा. सौ माया म्हैसने यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमांची रूपरेषा विशद केली. त्यानंतर पाहुण्यांना श्री गजानन माऊलींची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर झालेल्या मान्यवरांच्या भाषणातून सर्वप्रथम अकोला जिल्हा संपर्क संघटिका मा.सौ वैशालीताई घोरपडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याकरता एकत्र येऊन काम करावे असे सांगितले.तर करोना सारख्या काळात आपली पित्याप्रमाणे काळजी घेणाऱ्या उद्धव साहेबांचे हात बळकट करण्याकरता मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी भगिनींनी घ्यावी असे आवाहन मा सौ शिल्पाताई सरपोतदार यांनी आपल्या भाषणातून तर मा.सौ रंजनाताई नेवाळकर यांनी महिला बचत गटामार्फत आपल्याला कोण कोणते कार्य करता येते ,कोणत्या योजना आहेत व महिला आर्थिक दृष्ट्या कशा सक्षम करता होतील या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरिता सौ देवश्री ठाकरे, श्रीमती उषा गिरणाले, सौ. सुवर्णा ठाकरे, सौ वनिता वाकोडे, सौ रंजना गणात्रा ,सौ वैशाली इंगोले ,सौ किरण खाडे, श्रीमती शोभा भगत, कु. संगीता सावरकर. सौ रेखा कराड, सौ प्रतिभा जांभळे, सौ ज्योती लोखंडे, सौ वर्षा मावलकर, श्रीमती देवकाबाई कुईटे, सौ प्रतिभा पूडकर ,जिल्हा परिषद सदस्य गीता मोरे, सुभद्रा सुरत्ने तसेच अकोलाहून आलेल्या सौ.रेखा राऊत. सौ वर्षा पिसोडे ,सौ सीमा मोकळकर यांची तसेच अकोट विधानसभेतील बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती..