तेल्हारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
शिवसेनेने तहसीलदार यांना निवेदन देऊन दिला आंदोलनाचा ईशारा
तेल्हारा- सुरज इंगोले
तेल्हारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,सततच्या पावसाने नुकसान झाल्याने सर्वच पिकांची अधिसूचना काढून शेतकऱ्यांना तात्काळ २५% रक्कम पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी,सोयाबीनला किमान ७,००० रु हमीभाव देण्यात यावा व हमीभाव प्रमाणेच खरेदी करण्यात यावी व खुल्या बाजारात भाव कमी असल्यास शासनाने खरेदी करावी, कापसाला किमान १०,००० रुपये भाव देण्यात यावा,खुल्या बाजारात भाव कमी असल्यास शासनाने कापूस खरेदी करावा, मागील वर्षीची अतिवृष्टी व भावांतर योजनेचे पैशे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे,सततच्या पावसांमूळे व अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या पिकांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी या शेतकऱ्यांनच्या विविध मागण्यांकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तेल्हारा तहसीलदार समाधान सोनावणे यांना सविनय निवेदन सादर करण्यात आले, व मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात शिवसेना शेतकऱ्यांनसाठी मोठं आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी असा ईशारा देण्यात आला यावेळी माजी आमदार संजय गावंडे,तालुकाप्रमुख अजय पाटील गावंडे,शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे,सहसंघटक शंकरराव ताथोड, उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम गावंडे,संतोष उमाळे,माजी शहरप्रमुख राजेश वानखडे, सहसमन्वयक गजानन मोरखडे,माजी युवासेना तालुकाप्रमुख निलेशधनभर,उपशहरप्रमुख मनीष गवळी,गोपाल जायले,सुधाकर गावंडे,जि प सर्कल प्रमुख उध्दव पाथ्रीकर,गजानन नेरकर,गणेश कडू,आदित्य उमाळे,सुनील पवार,सतीश ढोले,प्रवीण पाथ्रीकर,राजेंद्र भाकरे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.