तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारीच्या पावसाने लाखोंचे नुकसान
विद्युत पुरवठा ही झाला खंडित, रस्त्यावर झाडे पडल्याने काही रस्ते बंद
तेल्हारा
तेल्हारा तालुक्यात संध्याकाळी अचानकपणे वातावरणात बदल झाला आणि काही आवराआवर करेस्तोवर सोसाट्याचा वारा सुटला सोबतच गारा ही पडू लागल्या गारीचा पाऊस कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करून गेला.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेत माल हा शेतातच राहिला अचानक वातावरण निर्मिती झाल्याने नुसती धावपळ सुरू झाली मात्र तरीही लाखोंचे पीक मातीत गेलेच, पंजाब डख यांनी काही दिवसांपूर्वी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील तूर,हरभरा या सारखी सोंगणी योग्य झालेली पिके तयार करण्यासाठी धावपळ केली मात्र ग्रामीण भागात मजुरांनी मारामार त्यात यंत्र सामुग्री पुरेशी नसल्याने अनेकांचे शेतात हरभरा, तुरीच्या गंज्या लागलेल्या होत्या काही शेतकऱ्यांकडे त्यावर झाकण ठेवण्यासाठी ताडपत्री सुद्धा नव्हती अशा शेतकऱ्यांचा शेत माल शेतातच ओला झाला तर काही शेतऱ्यांकडे व्यवस्था असल्याने त्यांचा शेत माल सुरक्षित राहू शकला तरी काही प्रमाणात नुकसान मात्र झालेच त्यात ज्यांचे पिकं उभे होते जसे गहू, हरभरा, तूर ,कांदा, पालेभाज्या, संत्रा, लिंबू च्या बागा नष्ट झाल्या असून शेतऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे,
झालेल्या गारपिटीने शेतकरी मेटाकुटीला आला असून शासन स्तरावर याची तात्काळ दखल घ्यावी व शेतऱ्याना मदतीचा हात द्यावा.