तेल्हाऱ्यात 8 वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन
24 व 25 फेब्रुवारीला आयोजन संमेलनाध्यक्ष बारोमासकार सदानंद देशमुख उद्घाटक डॉ. रवींद्र शोभणे
तेल्हारा -सुरज इंगोले
शहरातील स्व. अनंतराव भागवत मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ,शिक्षक साहित्य संघ व मासिक शिक्षकमत परिवार यांच्या संयुक्त सहकार्याने 8 वे.राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन 24 व 25 फेब्रुवारीला आयोजित केले आहे. याचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष जयदीप सोनखासकर यांनी केले
नियोजित साहित्य संमेलनाची तयारी बैठका यासंबंधी आयोजकांनी विचारविनिमय करण्यासाठी शेगाव नाक्या जवळील उंबरकर कॉम्प्लेक्स मध्ये कार्यालयाचे उद्घाटन माजी प्राचार्य अण्णासाहेब ढोले यांच्या हस्ते केले यावेळी जयदीप सोनखासकर , राजेंद्र भटकर चारुदत्त मेहरे रवींद्र वर्गे संघर्ष सावरकर शिवराज जामदे स्वागताध्यक्ष अरविंद गिऱ्हे प्रल्हाद ठोकणे उपस्थित होते यावेळी सोनखासकर यांनी शिक्षक साहित्य संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा इतिहास कथन केला शिवराज जामोदे यांनी साहित्य संमेलनाची रूपरेषा सांगितली. साहित्य नगरीस जेष्ठ साहित्यिक स्व भाई प्रभाकरराव सावरकर साहित्य नगरी तर विचारपिठास स्व.बाप्पसाहेब ठाकरे विचारपीठ असे नावे देवून जेष्ठ साहित्यिकांच्या स्मृती जोपासत 24 फेब्रुवारीला सकाळी ग्रंथ दिंडी व नोंदणी त्यानंतर उद्घाटन समारंभ यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ.सदानंद देशमुख उद्घाटक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे विशेष उपस्थितीमध्ये नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडवले अमरावती विभाग पदवीधर आमदार धीरज लिंगाडे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य एल बी पाटील व दुसरे सदस्य साहित्यिक पुष्पराज गावंडे उपस्थित राहतील प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर, केशवराव मेतकर कार्यकारणी सदस्य सुरेश खोटरे अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीता आढाव शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती माया नाईक डॉ. गोविंद गायकी हे उपस्थित राहतील यावेळी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व शिक्षकमत विशेषांकाचे प्रकाशन व अप्रूप, व्यासंग, अनुग्रह ,जातीय मढ जावो, आयुष्य पेलताना, कटूसत्य व संगिनी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल तिसऱ्या सत्रात भविष्यवेधी जागतिक शिक्षण व शिक्षक तथा समाजाची भूमिका या विषयावर परिसंवाद राहील याचे अध्यक्ष उदगीर येथील प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर राहतील यामध्ये निलेश घुगे हरीश ससनकर सुशील चिमोरे गणेश चव्हाण गोपाल ढोले शरदचंद्र बिडकर सहभागी होतील चौथ्या सत्रात कथाकथन राहणार असून याचे अध्यक्ष जळकोट येथील विलास सिंदगीकर राहतील यामध्ये अंबादास केदार सुषमा इसळ विनोद तीरमारेअनघा सोमवंशी हे कथाकार सहभागी होतील पाचव्या सत्रात वऱ्हाडी साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांची प्रकट मुलाखत तुलसीदास खिरोडकर घेतील त्यानंतर गायन कट्ट्या होईल सहाव्या सत्रात डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कवी संमेलन होईल यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी होतील
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नागपूरच्या चित्रा कहाते व डॉ. रणजीत गणोदे करतील सातव्या सत्रात लोककवी विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत संघर्ष सावरकर व शिवराज जामोद हे घेतील आठव्या सत्रात गझल मुशायरा चंद्रशेखर भुयार पुणे यांच्या अध्यक्षतेत होईल यामध्ये नामवंत गझरकार सहभागी होतील सूत्रसंचालन सतीश दराडे करतील नव्या सत्रात मुक्त संवादामध्ये आम्ही सावित्रीच्या लेकी या विषयावर शिक्षणाधिकारी सौ सुचिता पाटेकर राजश्री कोलखेडे सहभागी होतील त्यांची मुलाखत शिवराज जामोदे हे घेतील यानंतर दुसरे कवी संमेलन डॉ. गोविंद गायकी यांच्या अध्यक्षतेत होईल यामध्ये सुमारे 40 कवी सहभागी होतील दहावे सत्र समारोपीय कार्यक्रमाचे असेल याचे अध्यक्ष दैनिक लोकमत अकोला आवृत्तीचे संपादक किरण अग्रवाल राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे राहतील यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल.
अण्णासाहेब ढोले यांनी साहित्य संमेलने व्याख्याने इत्यादी साहित्य सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे व त्यातून समाजातील समस्यांवर प्रकाश टाकणे काळाची गरज आहे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघर्ष सावरकर यांनी केले तर आभार निमंत्रक चारुदत्त मेहरे यांनी मानले